एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेचे नियम बदलणार

1 जुलै 2025 पासून देशातील दोन प्रमुख बँका एचडीएफसी आणि आयसीआयसीआयचे नियम बदलणार आहेत. क्रेडिट कार्डचा उपयोग, थर्ट पार्टी वॉलेट ट्रान्झॅक्शन, आयएमपीएस ट्रान्सफर आणि एटीएम शुल्क संबंधित हे नियम बदलणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना याचा जोरदार फटका बसणार असून क्रेडिट कार्डच्या खर्चावर आता अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे.

थर्ड पार्टी वॉलेटवर 10 हजारांपेक्षा जास्त रकमेवर 1 टक्का शुल्क, इंधन ट्रान्झॅक्शनवरच्या 15 हजारांपेक्षा जास्त खर्चावर 1 टक्का अतिरिक्त चार्ज आणि 50 हजारांपेक्षा जास्त युटिलिटी बिल पेमेंटवर 1 टक्का अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. आयसीआयसीआय बँकेच्या मर्यादित ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर अतिरिक्त एटीएम चार्जेसवर आता 23 रुपये मोजावे लागतील. याआधीही ही रक्कम 21 रुपये होती.