
एअर इंडियाच्या बोइंग विमानांच्या सुरक्षेतील त्रुटी आता प्रकर्षाने समोर येऊ लागल्या आहेत. दिल्लीहून हाँगकाँगला जाणाऱ्या बोइंग-787 विमानाचा दरवाजा अचानक करकरू लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाल्याचा काही दिवसांपूर्वीचा प्रकार समोर आला आहे.
विमानाचा दरवाजा अचानक करकरू लागल्याचे फ्लाईटमधील कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दरवाजाच्या वरच्या बाजूकडील फटीत कागदी पेपर टाकले आणि ही फट बंद केली. त्यामुळे दरवाजा पॅक झाला आणि करकर थांबली. हे सगळं सुरू असताना विमान नियोजित दिशेने प्रवास करत होते आणि ठरलेल्या वेळी हाँगकाँग विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. बोइंग-787बाबत घडलेली ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी तीनदा असे प्रकार घडले आहेत. 2019मध्ये जपान एअरलाइन्सच्या विमानात आणि 2022मध्ये जर्मन पॅरियर टीयूआय एअरलाइन्स आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानातही हेच घडले होते.