
माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांना पोटगी देण्याच्या सत्र न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. तसेच मुंडे यांना त्यांच्या मालमत्तेबाबतची माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. घरगुती हिंसाचार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले होते. तसेच करुणा मुंडे यांना एक लाख पंचवीस हजारांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी हायकोर्टात आव्हान दिले. मुंडे यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.