अपघातात हात गमावलेल्या लेकीला शिवसेनेचा आधार, उपचारासह शिक्षणासाठीही मदत करणार

कांजूरमार्ग येथील आर्या शेटकर शालान्त परीक्षा देऊन खासगी बसने आपल्या गावी जात असताना झालेल्या अपघातात तिला डावा हात गमवावा लागला. याची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या वतीने आर्याच्या उपचारासह पुढील शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आर्या शेटकर हिने अपघातात हात गमावल्याने शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी आर्याच्या घरी जाऊन तिच्यासह कुटुंबाला धीर दिला. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असे ठाम आश्वासनही यावेळी देण्यात आले. शिवाय शिक्षणासह उपचाराची जबाबदारी घेत असल्याचे आमदार सुनील राऊत यांनी सांगितले. यावेळी म्युनिसल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कमद, विजय तोडणकर, तानाजी मोरे, सिद्धी जाधव, मामी मंचेकर, दीपक सावंत, श्वेता पावसकर, सचिन चोरमिळे, तुकाराम जगदाळे, योगेश पेडणेकर, लिना मांडलेकर, गायत्री ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.