
एआय क्रांतीसाठी नवीन हार्डवेअरची गरज लागणार नाही, असे विधान करणाऱ्या ओपनआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी यूटर्न घेतला आहे. ते आता म्हणतात की, एआयसाठी सध्याचे कम्प्युटर्स योग्य नाहीत. एआयचा वापर वाढवायचा असेल तर नव्या डिव्हाईसची गरज लागणार आहे. सध्याचे कम्प्युटर्स बिनकामाचे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. सॅम अल्टमन हे त्यांचा भाऊ जॅक अल्टमन यांच्या पॉडकास्टमध्ये बोलत होते. सॅमने म्हटले की, कम्प्युटर्स, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर एआयविना डिझाईन केले होते. परंतु, एआयमुळे आता संपूर्ण सिस्टम बदलली आहे. एआय प्रोग्रेससाठी नवीन हार्डवेअरची गरज नसेल. जर गरज पडली तर युजर्स नवीन डिव्हाईसमुळे खूष होतील असे म्हटले होते.