
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या ‘एमएमएस’ (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) आणि ‘एमसीए’ (मास्टर ऑफ कम्प्युटर ऑप्लिकेशन) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांसाठी 20 जुलै 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 17 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील.