1993च्या बॉम्बस्फोट खटल्यातील साक्षीदारांना 24 तास सुरक्षा द्या, सत्र न्यायालयाचे सरकारला आदेश

1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील साक्षीदारांना पुरवण्यात येणारी सुरक्षा त्रोटक असल्याने विशेष न्यायालयाने यावर आज नाराजी व्यक्त केली. या खटल्याच्या तिसऱया टप्प्यात साक्षीदारांची सुरक्षा महत्त्वाची असून या साक्षीदारांचे 24 तास संरक्षण व्हायला हवे. त्यामुळे पोलिसांची कडक सुरक्षा द्या, असे आदेश न्यायाधीश व्ही. डी. केदार यांनी सरकारला दिले.

12 मार्च 1993 रोजी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बारा बॉम्बस्फोट झाले, याप्रकरणी एकूण 123 जणांना अटक करण्यात आली, त्यापैकी 100 जणांना शिक्षा झाली. अनेक फरार आरोपींना नंतर पकडण्यात आले. त्यांचा खटला स्वतंत्रपणे चालवला जाणार आहे. आज शुक्रवारी या खटल्यावर सुनावणी झाली

मुंबई पोलिसांच्या संरक्षण शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी खटल्याच्या पहिल्या आणि दुसऱया भागात (आरोपी-माफीचा साक्षीदार म्हणून) साक्ष दिली तेव्हा 32 रक्षकांचे आणि एका बुलेटप्रूफ कारचे संरक्षण दिले होते. आता, खटल्याच्या तिसऱया टप्प्यात त्याला पुन्हा साक्षीदार म्हणून बोलावले जात आहे. परंतु कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही, असा दावा त्यांनी केला.