गुंतवणुकीच्या नावाखाली अभिनेत्रीची फसवणूक

बीट कॉइनमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली सिने अभिनेत्री आणि निर्मात्याची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी तीन जणा विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार या अभिनेत्री असून त्याने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. 2013 मध्ये नागपूर येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा तिची एका जणाशी ओळख झाली. भेटी नंतर एकाने अभिनेत्रीचा विश्वास संपादन केला. विश्वास संपादन केल्यावर त्याने तिला बिट कॉइन बाबत सल्ला दिला. त्यावर विश्वास ठेऊन तिने गुंतवणुकीचा निर्णय घेतला. केलेल्या गुंतवणुकीवर तोटा झाल्याचे लक्षात आले. घडल्या प्रकरणी तिने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली.