
हिमाचल प्रदेशात दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील तब्बल 285 रस्ते बंद करण्यात आले आहेत. या रस्त्यांवरून वाहतूकही बंद करण्यात आल्याने वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होत आहे. मान्सून दाखल झाल्यापासून हिमाचल प्रदेशात आतापर्यंत 39 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर गेल्या 24 तासांत तिघांचा बळी गेल्याचे समोर आले आहे.
हिमाचलच्या मंडी-कुल्लू नॅशनल हायवेवर थलोटच्या भूभू जोत टनलजवळ आज सकाळी भूस्खलन झाले. या टनलमध्ये तब्बल पाच तास अनेक वाहने अडकून पडली होती. हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यामुळे 4 जिह्यांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या.