
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला मोर्चा आता गुन्हेगारी लोकांकडे वळवला आहे. जे लोक डोक्यात बेसबॉल बॅट घालून किंवा धारदार चाकूने दुसऱ्यांवर हल्ला करतात. त्यांना अमेरिकेतून हाकलून लावले पाहिजे, प्रशासनापुढील काम हेच असले पाहिजे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जे लोक गुन्हेगार आहेत. मग ते जरी अमेरिकन नागरिक असले तरी त्यांना हाकलून लावणे प्रशासनाचे काम आहे, असे ट्रम्प म्हणाले.