थायलंडला दोन दिवसांत मिळाला दुसरा पंतप्रधान

थायलंडला दोन दिवसांत दुसरे पंतप्रधान मिळाले आहेत. गृह मंत्री फुमथम वेचायचाई यांनी आज कार्यवाहक पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या आधी 23 तासांसाठी सूर्या जुंगरुंगरेंगकीट हे 24 तासांचे पंतप्रधान होते. निलंबित पंतप्रधान पाइतोंगटार्न शिनावात्रा बुधवारी सूर्या यांची देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नेमणूक करण्यात आली होती. शिनावात्रा यांना 1 जलै रोजी पदावरून काढून टाकण्यात आले होते. शिनावात्रा यांच्यावर एका कंबोडियन नेत्याशी दूरध्वनीवरून संभाषण केल्याचा आरोप आहे. त्यांचे कॉल रेकार्ंडग व्हायरल झाले होते. त्यांचे हे संभाषण नैतिकतेचे उल्लंघन मानले गेले. थायलंडचे राजा महा वजिरालोंककॉर्न यांच्या उपस्थितीत झालेल्या  बैठकीत नवीन मंत्रिमंडळाने फुमथम यांना कार्यवाहक पंतप्रधान नियुक्त करण्यास सहमती दर्शवली.