
एका व्हायरल व्हिडीओतील आजी-आजोबांनी मन जिंकून घेतलेय. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील ‘कोई लडका है… कोई लडकी है’ या गाण्यावर आजी-आजोबांनी ‘रील’ बनवलीय. ही रील चांगलीच व्हायरल होतेय. ‘वयाच्या 80 व्या वर्षी मी आणि माझी बेस्टी’ अशी या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलीय. यामध्ये आजी-आजोबा खूप सुंदर अभिनय करताना दिसताहेत. शेवटच्या दोन लाइन म्हणायला आणखी दोन आज्जी या व्हिडीओमध्ये येतात आणि शेवटी चारही जण एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून या रीलचा शेवट करतात.
‘शांतई सेकंड चाईल्डहूड’ या इन्स्टा अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. त्यावर नेटिजन्स काैतुकाचा वर्षाव करत आहेत. ‘या लोकांमध्ये किती सकारात्मकता आहे. एनर्जेटिक सुंदर व्हिडीओ’, ‘जुलै महिन्यातील सर्वात सुंदर रील’ अशा प्रतिक्रिया युसर्जनी दिल्या आहेत.