
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांचा विधिमंडळातर्फे 8 जुलै रोजी दुपारी दोन वाजता सत्कार करण्यात येणार आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा सत्कार समारंभ होईल. यावेळी न्या. गवई हे ‘भारताची राज्यघटना’ या विषयावर दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिली.