4 महिन्यांत 22 वाघ, 40 बिबटय़ांचा मृत्यू

राज्यात जानेवारी ते एप्रिल 2025 या काळात 22 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी विधानसभेत सादर झालेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून पुढे आली आहे. जानेवारी 2022 ते डिसेंबर 2024 या दरम्यान राज्यात विविध कारणांनी 107 वाघांचा मृत्यू झाल्याचीही आकडेवारी आहे. अपघात, शिकार, विजेचा धक्का, कुत्र्यांचे हल्ले अशा विविध कारणांमुळे या वाघांचा मृत्यू झाला आहे. लेखी उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे.