घरात झुरळे झाली असतील तर, हे करून पहा

घरात साफसफाई करूनही सतत झुरळे होत राहतात. घरात एकदा झुरळांचा शिरकाव झाला की, मग ती अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाहीत. झुरळे घरातून घालवण्यासाठी घरगुती सोपे उपाय करून पहा. लसूण बारीक करून त्यात व्हिनेगर घाला आणि हा स्प्रे बाटलीत भरून झुरळ असलेल्या ठिकाणी फवारा मारा.

पाण्यात लाल तिखट मिसळून ते एका स्प्रे बाटलीत भरा आणि घरात ज्या ठिकाणी जास्त झुरळे झाली आहेत, तिथे त्या पाण्याची फवारणी करा. अशा प्रकारे झुरळांचा नायनाट करण्यासाठी हे तिखट पाणी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. झुरळांना पळवून लावण्यासाठी कापूर बारीक करून त्याची पावडर बनवा आणि ज्या ठिकाणी झुरळे फिरतात, त्या ठिकाणी ठेवा, हेही फायदेशीर आहे.