
हिंदुस्थानमधून अमेरिकेला निर्यात केलेला 4 कोटी 28 लाख रुपये किमतीचा आंबा कागदपत्रांतील त्रुटींमुळे स्वीकारण्यास अमेरिकेतील यंत्रणेने नकार दिला. त्यामुळे हा आंबा निर्यातीपूर्वीच मुंबईत नष्ट करावा लागल्याची माहिती राज्याच्या पणन विभागाच्या वतीने विधानसभेत देण्यात आली.
अमेरिकेत पाठवण्यात आलेल्या आंब्याच्या संदर्भात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात पणन मंत्री जयपुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे. यंदाच्या मे महिन्यात ही घटना घडली. आंबा निर्यात करण्यापूर्वी अमेरिकेत विकिरण केंद्रावर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंब्यावर विकिरण प्रक्रिया केली जाते, पण यावेळी कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे हा आंबा स्वीकारण्यास नकार दिला.