
स्वतःच्या मालकीच्या वाहनाने प्रवास करणे कधीही चांगले. परंतु, कधी कधी लांबच्या ठिकाणी जाताना मध्यरात्री गाडी अचानक बंद पडते. त्यावेळी काय करावे हे सूचत नाही.
गाडी कशामुळे बंद पडलीय हे सर्वात आधी तपासा. त्यानंतर गाडी रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे पार्क करा अन् इमर्जन्सी लाइट्स सुरू करा.
गाडी रस्त्याच्या मधोमध बंद पडल्यास अन्य गाडय़ांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गाडीची लाईट सुरू करणे अन्य वाहनांसाठी फायदेशीर ठरते.
तुमच्या वाहनाचा वार्ंनग ट्रँगल सुरू ठेवल्याने दूरवरून येणाऱया वाहनांना तुमच्या गाडीबद्दल अंदाज येईल. त्यामुळे अपघात होण्याची भीती टळू शकते.
ओळखीच्या लोकांना किंवा रस्त्याने जाणाऱया लोकांना मदतीसाठी हाक द्या. टोलफ्री 100 नंबरवर फोन करू शकता. गाडी बंद पडल्यावर घाबरू नका. शांतपणे परिस्थिती हाताळा