केस गळत असतील तर? हे करून पहा

सध्या अनेक जण कमी वयात केस गळती होत असल्याने त्रस्त आहेत. काय करावे हे कळत नाही. केस गळणे थांबविण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. नियमित तेल लावणे, संतुलित आहार घेतल्यास, ध्यान धारणा आणि योगा केल्यास आणि तणाव कमी केल्यास केस गळणे कमी होऊ शकते.

नारळ तेल केसांना लावल्याने मजबूत होऊन तुटणे कमी होते. मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट केसांना लावल्यास केस गळणे थांबते. आवळ्याचा रस किंवा पावडर लावल्यास केस गळती थांबते. कांद्याचा रस काढून तो केसांना लावल्याने केस गळणे थांबते. लिंबाचा रस केसांना लावल्याने कोंडा कमी होतो.