‘तेजस एमके1ए’ची अग्निपरीक्षा; ‘अस्त्र’ क्षेपणास्त्र डागण्याची तयारी, ऑगस्टमध्ये होणार महत्त्वाची फायरिंग चाचणी

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेट (एचएनएल) आपल्या संरक्षण क्षमतेला नव्या उंचीवर घेऊन जायच्या तयारीत आहे. एचएनएलने ‘तेजस एमके1ए’ विमानातून पहिल्यांदाचा अस्त्र एमके1 क्षेपणास्त्र डागण्याची तयारी सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात ही महत्त्वाची फायरिंग चाचणी होणार आहे. ही चाचणी लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट कार्यक्रमासाठी ऐतिहासिक पाऊल असेल.

तेजस एमके1ए हे एक स्वदेशी बनावटीचे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने ( एचएनएल) तेजस एमके1ए ची निर्मिती केली आहे. तेजस एमके1 लढाऊ विमानाची हे प्रगत व्हर्जन आहे. जुन्या मिग विमानांची जागा आता ‘तेजस एमके1ए’ घेणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या वायुदलासाठी हे विमान खूपच महत्त्वाचे आहे. हवाई हल्ले आणि जमिनीवरील युद्धाच्या दृष्टीने सक्षम आहे.