सी लिंकवर स्टंटबाजी दोघांवर गुन्हा

वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या काठावर चढून स्टंट केल्याच्या आरोपाखाली गायक यासिर देसाईसह दोघांवर वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. जिवघेणे कृत्य केल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.

दक्षिण आणि मध्य मुंबईला जोडणाऱया सागरी सेतूवरून रोज लाखो वाहने ये-जा करत असतात. एक गायक हा सागरी सेतूच्या खांबावर चढून स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या सोशल मीडियाच्या व्हिडिओची पोलिसांनी तपासणी केली. एकाने सी लिंकवर गाडी थांबवली. त्यानंतर तो सेतूच्या खांबावर चढला. त्यानंतर दोघांनी ते स्टंट रेकॉर्ड केले. रेकॉर्ड केल्यावर ते निघून गेले. सी लिंकवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयात हा प्रकार कैद झाला. सकाळी सहाच्या सुमारास गायक हा सी लिंकवर आला. त्यानंतर त्याने तो स्टंट केल्याचे सूत्रांनी सांगितले.