
मिंधेंचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ संजय गायकवाड हे फक्त टॉवेल व बनियनवर येऊन कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण करताना दिसत आहेत.
मिंधे आमदार संजय गायकवाड यांचा आमदार निवासात राडा, कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण
#viralvideo #sanjaygaikwad pic.twitter.com/FNGxcl40WL— Saamana Online (@SaamanaOnline) July 9, 2025
संजय गायकवाड हे सध्या विधी मंडळाच्या अधिवेशनासाठी मुंबईत आले आहेत. ते आमदार निवासात राहत असून मंगळवारी त्यांनी तिथल्याच कॅन्टीनमधून जेवण मागवले होते. मात्र त्या जेवणातील डाळीला वास येत असल्याने संजय गायकवाड हे थेट बनियन टॉवेलवरच कॅन्टीनमध्ये पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला बोलावले व डाळीबाबत जाब विचारला. त्यानंतर त्यांनी त्याला मारहाण केली. यावेळी आमदारांसोबत असलेल्या काही लोकांनी देखील संधी साधत कॅन्टीन ऑपरेटवर हात साफ केला.