IND Vs ENG 3rd Test – लॉर्ड्सवर रंगणार वेगवान माऱ्याचा थरार! इंग्लंडच्या संघात चार वर्षांनी हा खेळाडू करणार पुनरागमन

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला तर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे लॉर्ड्स होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यत विजय मिळवून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील. अशातच तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात तब्बल चार वर्षांनी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा समावेश करण्यात आला आहे.

लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या 11 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघामध्ये कर्णधार बेन स्टॉक्स, झॅक क्रोली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर आणि शोएर बशीर यांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाज जोश टंगच्या जागी जोफ्रा आर्चरचा तिसऱ्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. चार वर्षांची जोफ्रा आर्चर संघात पुनरागमन करणार आहे. त्याने इंग्लंडसाठी शेवटची कसोटी फेब्रुवारी 2021 मध्ये खेळली होती. त्याने आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले असून त्याच्या नावावर 42 विकेट आहेत. त्याचबरोबर त्याने आपल्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर तीन वेळा पाच विकेट घेण्याची किमया साधली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाविरुद्ध त्याचा खेळ बहरणार का नाही? हे पाहण्यासाठी इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळणार आहे.