
पत्रकारांचे डॉक्टर अशी ओळख असलेले डायबेटॉलॉजिस्ट डॉ. सतीश नाईक यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. सतीश नाईक यांनी कादंबरी, कथासंग्रह, विनोदी साहित्य, कविता, ललित लेखनही केले. दै. ‘सामना’, साप्ताहिक ‘मार्मिक’मध्ये त्यांनी वैद्यकीय विषयांवर विपुल लेखन केले. सतीश नाईक यांच्या नावावर ‘चकरक चकरक’, ‘कोरोनासोबत जगताना’, ‘कॅन्सर म्हणजे डोकं फिरलेल्या पेशी’, ‘एका वाघाची गोष्ट’, ‘सत्कारगुच्छ’, ‘ताणतणाव’, ‘हृदयाची गोष्ट’, ‘कधीतरी कुठेतरी’ (काव्यसंग्रह), ‘डायबिटीज और रमजान’ (हिंदी), ‘श्री सिद्धिविनायक मंदिर’ (गुजराती) अशी अनेक पुस्तके आहेत.