
अनेक लोकांचे अचानक ओठ सुकतात. काहींच्या ओठांना छोटय़ा-छोटय़ा चिरा पडतात. बऱ्याचदा कमी पाणी प्यायल्याने ही समस्या उद्भवते. असं होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम, परंतु यावर घरगुती उपायसुद्धा आहेत. व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळेसुद्धा ओठ सुपू शकतात.
आवळा तेल ओठावर लावल्याने ओठ नरम पडतात. आवळा तेलात व्हिटॅमिन सी असते. गाईचे ओरिजनल तूप ओठावर लावणे नैसर्गिकदृष्टय़ा चांगले आहे. यामुळे ओठ मऊ होतात. मध ओठावर लावणे हेही चांगले आहे. रात्री झोपण्यापूर्वी नारळाचे तेल ओठाला लावल्यास ओठ मऊ पडतात. दिवसभरात जास्तीत पाणी प्यायल्यानेसुद्धा ओठ सुकत नाहीत.