मेडिक्वीन भारत सौंदर्य स्पर्धेत डॉ. दीपाली राणे-चौधरीची बाजी 

पुणे येथे पार पडलेल्या ‘मेडिक्वीन भारत मिस अॅण्ड मिसेस 2025’ या राष्ट्रीय सौंदर्य व व्यक्तिमत्त्व स्पर्धेत दादर येथील डॉ. दीपाली राणे-चौधरी यांनी रॉयल कॅटेगरीत ‘सेकंड रनरअप’ हा बहुमान मिळवला.  डॉ. दीपाली या ‘मास्टर्स इन डेन्टीस्ट्री’ आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच अभिनेते राकेश बापटही या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रेरणा बेरी व डॉ. प्राजक्ता शाह यांनी केले.