गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड; तोकडे कपडे नको, संस्कृती जपणारेच कपडे घाला

रत्नागिरीतील श्री देव गणपतीपुळे मंदिरात आता भाविकांसाठी ड्रेसकोड लागू होणार आहे. गणेशोत्सवापासून ही ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. त्यामुळे भाविकांना तोकडे कपडे घालण्यास बंदी राहणार असून मंदिरात येताना संस्कृती जपणारेच कपडे घालावे लागतील.

मंदिरात अनेक वेळा तोकडे कपडे घालून भाविक प्रवेश करतात. त्यामुळे मंदिरात ड्रेसकोड असावी हा मुद्दा गेल्या काही वर्षांत पुढे आला. रत्नागिरी जिह्यातील काही मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आली होती. गणपतीपुळे मंदिरात भाविकांसोबत पर्यटकही मोठय़ा संख्येने येतात. काही प्रमाणात परदेशी पर्यटकही असतात. अशा वेळी तोकडे कपडे किंवा ठिकठिकाणी फाटलेल्या जिन्स पँट घालून पर्यटक आणि भाविक येतात. अशा पर्यटक आणि भाविकांना आता अंगभर कपडे घालावे लागणार आहेत. गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यासंदर्भात गणपतीपुळे मंदिराची पंच समिती लवकरच एक बैठक आयोजित करणार आहे.