वन डेतही शुभमनच रोहितचा वारसदार, कसोटी निवृत्तीमुळे रोहित शर्माचे वन डे नेतृत्वही संकटात

कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आता रोहित शर्माचे एकदिवसीय संघातील कर्णधारपदही धोक्यात आले आहे. कसोटीप्रमाणे आता वन डेची धुरा ही शुभमन गिलच्याच खांद्यावर सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 2027 च्या विश्वचषक स्पर्धेत गिल हिंदुस्थानचे नेतृत्व करताना दिसू शकतो. रोहित किती काळ आपले स्थान टिकवून ठेवू शकेल हे स्पष्ट नाही. ऑक्टोबर महिन्यात हिंदुस्थान तीन सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून या मालिकेतदेखील गिलच वन डे संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.

डिसेंबर 2024 मध्ये रोहितने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटीतून माघार घेतली, ती रोहितची कर्णधार म्हणून त्याची शेवटची कसोटी होती. त्याने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाचे नेतृत्व करत विजेतेपद पटकावून दिले होते. त्यानंतर 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली. त्यावेळी त्याने इंग्लंडचा कसोटी संघ जाहीर होण्यापूर्वी बीसीसीआयच्या निवड समितीने रोहितला कसोटी कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे रोहितने तडकाफडकी कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली.