Air India Flight Crash तु इंजिन कटऑफ का केलंस? पायलटचं अखेरचं संभाषण आलं समोर

Ahmedabad: Remains of an Air India plane that crashed moments after taking off from the Ahmedabad airport, Thursday, June 12, 2025. (PTI Photo)(PTI06_12_2025_000130B)

अहमदाबाहून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान 12 जून रोजी उड्डाणाच्या काही सेकंदातच कोसळले. या अपघातात विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी बचावला होता. या अपघाताने संपूर्ण देश हादरला होता.

दरम्यान या अपघाताच्या महिनाभरानंतर एक प्राथमिक अहवाल आला आहे. त्यात कॉकपिटमधील पायलटचे संभाषण रेकॉर्ड झाले आहे. त्या रेकॉर्डिंगनुसार विमान कोसळण्याच्या काही सेकंद आधी एका पायलटने दुसऱ्या पायलटला ‘तु इंजिन कटऑफ का केलंस? असं विचारतो. त्यावर दुसरा पायलट मी काहीही केलेलं नाही असं सांगतो. या संभाषणानंतर काही सेकंदातच विमान कोसळते. दोन्ही पायलट्समधील हे संभाषणाचा उल्लेख प्राथमिक चौकशीच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे.