स्मशानभूमीत महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडला भाजप नेता, व्हिडीओ व्हायरल

भाजप नेते मनोहरलाल धाकड यांचा महामार्गावर आक्षेपार्ह स्थितीतला व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आणखी एका भाजप नेत्याचा स्मशानभूमीतील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राहुल वाल्मिकी असे त्या नेत्याचे नाव असून तो बुलंदशहार जिल्ह्यातील भाजपचा अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्हा मंत्री आहे.

राहुल वाल्मिकीचे त्याच शहरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. ते दोघे शुक्रवारी शिकारपूर येथील कैलावन गावातील स्मशानूभूमीत गेले होते. तेथे कार पार्क करून त्या कारमध्ये ते त्या दोघांचे अश्लील प्रकार सुरू होते. लोकांनी त्यांना रंगेहाथ पकडले.

नागरिकांनी त्यांचे व्हिडीओ बनवायला सुरुवात केली तसे दोघही चेहरे लपवू लागले. या व्हिडीओत राहुल लोकांना व्हिडीओ बनवून नका पाया पडतो अशी वनंती करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून सध्या राहुल फरार झाला आहे.