आठ तासांच्या शिफ्टची दीपिकाची मागणी चुकीची

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने केलेल्या 8 तासांच्या शिफ्टची मागणी ही चुकीची आहे, असे मत चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनी म्हटले आहे. दीपिकाची ही मागणी अवास्तविक आहे. जर कोणत्याही कलाकाराने 8 तासांच्या शिफ्टची मागणी केली असेल तर त्यांनी लिहून द्यायला हवे की, ते 8 तास कोणत्याही अडथळ्याविना काम करतील, असे सुनील दर्शन यांनी म्हटले आहे. दीपिकाच्या 8 तासांच्या मागणीला विक्रांत मेस्सी, रश्मिका मंदाना, अनुराग बसू यांनी पाठिंबा दिला आहे.