
आपल्या हिंदू धर्मात उपवासाचे खूप महत्त्व आहे. उपवास म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर साबुदाणा आला असेलच. आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये उपवासासाठी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा असे खूप सारे साबुदाण्याचे पदार्थ केले जातात. खासकरुन उपवासाला खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा सर्वात जास्त वापरला जातो? हा असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का. उपवासामध्ये पोट भरण्याशिवाय साबुदाण्याचे खूप महत्त्वाचे उपयोग आहेत.
साबुदाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
साबुदाण्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असते, त्यामुळे पचन उत्तम होते.
साबुदाण्यामध्ये कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत्र असल्यामुळे, हाडांच्या बळकटीसाठी साबुदाणा खायलाच हवा.
रजोनिवृत्तीच्या काळात अनेक स्त्रियांना एंडोमेट्रिओसिस आणि अतिरिक्त रक्तस्त्राव यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीतही साबुदाण्याची खिचडी खूप उपयुक्त ठरू शकते.
रक्तदाब कमी करण्यासाठी आहारात साबुदाण्याचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मासिक पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी रक्तस्त्राव जास्त होत असल्यास, एक वाटी खिचडी खाऊ शकता. यासोबतच आठवड्यातून एकदा साबुदाण्याची खिचडी जरूर खावी.
साबुदाणा आरोग्यापासून ते विविध हार्मोन्सपर्यंत अनेक गोष्टींमध्ये उपयुक्त ठरू शकते. त्यामुळेच हे महिलांसाठी एक सुपर फूड मानले जाते.
Cooking Tips- खमंग आणि मोकळी साबुदाणा खिचडी करण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
साबुदाणा खिचडी जागतिक स्तरावर खूप पसंत केली जात आहे आणि दुग्धविरहित, ग्लूटेन मुक्त पौष्टिक खाणे म्हणून गणली जात आहे.
तुम्हाला फ्लू किंवा कोणत्याही प्रकारचा ताप असेल तर तुमची भूक नक्कीच कमी झाली असेल, अशा परिस्थितीत तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊन टेस्ट सुधारू शकता.
प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही साबुदाण्याचे सेवन करू शकता. प्री-मेनोपॉज अवस्थेतही साबुदाणा खिचडी खाऊ शकता.
ओव्हुलेशन दरम्यान स्पॉटिंग दिसल्यास काय खावे हा प्रश्न अनेक महिलांना पडतो. या काळात अनेक महिलांना स्पॉटिंगची समस्या दिसून येते. तुमच्याही बाबतीत असे असेल तर तुम्ही साबुदाण्याचा आहारात समावेश करु शकता.
पीरियड्समध्ये भूक लागत नसेल तर, साबुदाणा खिचडी खाऊ शकता. दुपारच्या जेवणात 1 वाटी खिचडी दह्यासोबत खाल्ल्यास पचनासाठी खूप फायदा होतो.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. )