
हिंदुस्थानी इंटरनॅशनल मास्टर वंतिका अग्रवाल हिने महिला वर्ल्ड कपच्या दुसऱया फेरीत 14व्या महिला वर्ल्ड चेस चॅम्पियन ग्रँडमास्टर उन्ना उशेनीनाचा 4.5-3.5 अशा गुणफरकाने पराभव करत आगेकूच केली. याचबरोबर कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली, आर. वैशाली व दिव्या देशमुख या हिंदुस्थानी खेळाडूंनी तिसऱया फेरीत प्रवेश केला.
वंतिकाला आता तिसऱया फेरीत माजी वर्ल्ड रॅपिड व तीन वेळा वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियन असलेल्या रशियन ग्रँड मास्टर कॅटेरिना लागनोविरुद्ध खेळावे लागेल. पहिल्या रॅपिड टायब्रेकमध्ये वंतिकाने ड्रॉ खेळला, दुसऱ्या सामन्यात जिंकण्याची संधी गमावली. त्यानंतर 10औ10 रॅपिडमध्ये पहिला गेम जिंकला, दुसरा हरली, परंतु 5औ3 ब्लिट्झमध्ये पहिला गेम जिंकून दुसरा ड्रॉ करून मालिका आपल्या नावावर केली.
दुसरीकडे, इंटरनॅशनल मास्टर पद्मिनी राऊतला माजी वर्ल्ड चॅम्पियन स्टेडझरड्सच्या अलेक्झांड्रा कोस्टेनियुककडून 4.5-3.5 असा पराभव पत्करून स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. पद्मिनीने 10औ10 रॅपिडमध्ये आघाडी घेतली होती; पण निर्णायक क्षणी संधी गमावली. दुसरीकडे, पदार्पण करणाऱया इंटरनॅशनल मास्टर प्रियंका हिला पोलंडच्या आयएम क्लॉडिया कुलोनकडून 3-1 असा पराभव पत्करावा लागला.
कोनेरू हम्पीने उझबेकिस्तानच्या एफआय अफरूजा खाम्दामोवा हिच्याशी ड्रॉ खेळून आगेकूच केली. दिव्या देशमुखने जॉर्जियाच्या डब्लूएफएम केसारिया म्गेलाद्वे हिच्याशी ड्रॉ खेळून 1.0-0.5 अशी बाजी मारली. हरिकाने माजी राष्ट्रीय विजेत्या नंधिधा पी. व्ही. हिचा पराभव करीत आगेकूच केली. वैशालीने कॅनडाच्या मॅली जेड औलेट हिचा लागोपाठच्या दोन डावांत पराभव करून तिसरी फेरी गाठली.
आता तिसऱ्या फेरीत हिंदुस्थानच्या कोनेरू हम्पीचा सामना पोलंडच्या क्लॉडिया कुलोनसोबत, हरिका द्रोणावल्लीचा ग्रीसच्या स्टारटौलाशी, दिव्या देशमुखचा युरोपियन चॅम्पियन आइरीन टेओडोराने इन्जाकसोबत आणि आर. वैशाली हिचा रशियाच्या पियू करिसा हिच्याशी होणार आहे.