सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवण्याची धमकी

अमृसर येथील सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर सुवर्ण मंदिरात शिरोमणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या वतीने टास्क फोर्स आणि बाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.