तुमचे रेशन कार्ड बंद झाले तर…

– रेशन कार्ड रद्द होण्यापासून वाचण्यासाठी नियमितपणे रेशनवर मिळणाऱया सुविधा घ्या. पोर्टलवरील तपशील नेहमी अपडेट ठेवा.

– गरज नसल्यास कार्ड रद्द करण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा. रेशन कार्ड पुन्हा ऑक्टिव्ह करणे ही सोपी प्रक्रिया आहे. मात्र वेळेत योग्य पावले उचलणे गरजेचे आहे.

– जर तुमचे रेशन कार्ड जुने असेल किंवा केवायसी अपडेट नसेल तरीसुद्धा ते रद्द होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जवळच्या केंद्रावर जाऊन ते अपडेट करा.

– रेशन कार्ड सुरू करण्यासाठी राज्याच्या अधिकृत पोर्टलला लॉगइन करा. सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) ला भेट द्या.

– रेशन कार्ड करेक्शन हा पर्याय निवडा. त्यामध्ये कार्ड डिटेल भरा. रेशन कार्ड नंबर आणि संबंधित तपशील भरून सबमिट करा. पीडीएस कार्यालयात अर्ज सबमिट करा.