
मागच्या दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची दुसरी घटस्पहटित पत्नी रेहम खान यांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. पाकिस्तान रिपब्लिक पार्टी असे या पक्षाचे नाव आहे.
कराचीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रेहम खान यांनी ही घोषणा केली. हा केवळ राजकीय पक्ष नसून एक राजकीय जनआंदोलन आहे. योग्य लोक देशाच्या संसदेत जावेत, हा आमच्या पक्षाचा उद्देश आहे. असे त्यांनी सांगितले. रेहम खान यांनी 2014 साली इम्रान खान यांच्याशी विवाह केला होता. अवघ्या 10 महिन्यांतच दोघांनी घटस्पह्ट घेतला. रेहम या पश्तुनी कुटुंबातून आल्या आहेत. त्यांचा जन्म लिबियामध्ये झाला आहे. अनेक वर्षे त्या लंडनमध्ये राहिल्या आहेत.