अहमदाबाद अपघातप्रकरणी दिशाभूल करणाऱ्या बातम्या दिल्या! ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ व ‘रॉयटर्स’ला दणका

अहमदाबाद विमान अपघाताच्या चुकीच्या बातम्या देणाऱया ‘रॉयटर्स’ व ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (एफआयपी) संघटनेने दणका दिला आहे. ‘एफआयपी’ने या दोन्ही मीडिया हाऊसेसना कायदेशीर नोटीस बजावून माफी मागा, अशी मागणी केली आहे.

एअर इंडियाच्या बोईंग विमानाला 12 जून रोजी अहमदाबादेत झालेल्या अपघातात 270 जणांचा मृत्यू झाला होता. एअरक्राफ्ट ऑक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) केलेल्या प्राथमिक चौकशीत अपघाताबाबत कोणताही निष्कर्ष काढला नव्हता. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि ‘रॉयटर्स’ने मात्र थेट वैमानिकांनी जाणीवपूर्वक इंधनाचे स्वीच ऑफ केल्यामुळे अपघात झाल्याच्या बातम्या दिल्या. वैमानिकांच्या संघटनेने यास तीव्र आक्षेप घेतला आहे.