कन्नडिगांची मुजोरी! बेळगाव महापालिकेने हटविले गणेशोत्सवाचे मराठी फलक

बेळगावातील भगतसिंग चौक पाटील गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवाचे मराठी भाषेत फलक लावले होते. ते फलक रात्रीच्या रात्रीत बेळगाव महापालिकेने हटवले आहेत. फलक कन्नड भाषेत लिहला नसल्याचे सांगत बेळगाव महापालिकेने ही कारवाई केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

महापालिकेच्या या मराठीद्वेष्ट्या कारवाईवरून सध्या बेळगावमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दुकानाचे नामफलक हे कन्नडमध्ये लिहण्याचा नियम असताना त्या नियमाच्या आधारे बेळगाव महापालिका होर्डिंगवर कशी कारवाई करू शकते असा संतप्त सवाल मराठी नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत.