
बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी हिदुस्थानच्या नौदलाला भेट दिली आहे. आणि या भेटीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून नौदलाच्या युद्धनौकेवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह अमिताभ यांनी हिंदुस्थानी नौदलाबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंदुस्थानी असल्याचा अभिमान आहे, असे अमिताभ यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच या पोस्टमध्ये अमिताभ यांनी नौदलातील जवानांच्या शौर्याच्या आणि त्यागाच्या कथा आपण ऐकतो. पण जेव्हा आपण या जवानांना प्रत्यक्ष पाहतो, अनुभवतो, तेव्हा समजतं की, आपण शांत का झोपू शकतो. कारण कुणीतरी आपल्या रक्षणासाठी लढत असतं. आपल्या देशाच्या रक्षणासाठीचं जवानांचं समर्पण, शिस्त आणि इच्छाशक्ती पाहून मन भारावून जातं. आपण सुरक्षित आहोत; कारण ते आपल्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस झटत असतात.” त्याचबरोबर “मी आज जे पाहिलं, त्यामधून खूप काही शिकलो. काही गोष्टी अशा आहेत; ज्या सर्वसामान्यांना माहितीही नसतात… पण त्या जाणून घेऊन मन अभिमानाने भरून येतं. मी माझा एक दिवस नौदलाच्या युद्धनौकेवर घालवला आणि हा माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव आहे. मी हिंदुस्थानचा नागरिक आहे आणि जे आपल्यासाठी स्वत:चं सर्वस्व देतात, त्यांच्याबद्दल माझ्या मनात अभिमान आणि आदर आहे.”
T 5458 –
You hear about the strength of our Forces .. you hear the stories of valour about our soldiers that sacrifice their lives for us all .. you discover and learn the armoured vessels that fight, so you and I can get a peaceful sleep ..You marvel at the dedication and will… pic.twitter.com/05bY5H1Au7
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 31, 2025