अनिल अंबानींना ईडीने बजावले समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना 17,000 कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. अनिल अंबानी यांना 5 ऑगस्ट रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे, जिथे त्यांची या प्रकरणासंदर्भात चौकशी केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांना दिल्लीतील ईडी मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या तपासात येस बँकेने 2017-19 दरम्यान रिलायन्स ग्रुपच्या कंपन्यांना दिलेल्या 3,000 कोटींच्या कर्जाची अनियमितता आढळली. याशिवाय रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने 10,0000 कोटींची निधी हस्तांतरण आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल) मधील 3,742 कोटींवरून 8,670 कोटींवरील कॉर्पोरेट कर्जवाढीवर सेबीच्या अहवालात प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्टेट बँकेने रिलायन्स कम्युनिकेशन्सने (आरकॉम) फसवणूक केल्याचा आरोप करत सीबीआयकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.