
बिहारमधील मतदार याद्यांमध्ये फेरपडताळणी करण्याच्या केंद्रिय़ निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात संसदेत विरोधकांमध्ये असलेला रोष अजूनही कमी झालेला नाही. विरोधकांनी या मुद्दय़ावरून सरकारला दोन्ही सभागृहात धारेवर धरल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. सततच्या गोंधळानंतर कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
विरोधकांनी लोकसभेचे कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे कामकाज दुपारी बारा त्यानंतर दोननंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही गदारोळ कायम राहिला.