
उत्तराखंड येथील भगवान शिव यांच्या 11 व्या ज्योतिर्लिंग बाबा केदारनाथ धामची यात्रा शनिवारी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यांवर भूस्खलन झाल्यामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती, परंतु आता पुन्हा ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी भाविकांना आता 22 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागणार आहे. सोनप्रयागहून भाविकांना गौरीकुंडमार्गे केदारनाथला पाठवले जात आहे, असे रुद्रप्रयागचे पोलीस अधीक्षक सर्वेश सिंह यांनी सांगितले.