
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करतानाच विशेष सत्र न्यायालयाने तपास पद्धतीतील विसंगतीवर बोट ठेवले. एटीएस आणि एनआयएने सादर केलेल्या पुराव्यात विरोधाभास असून ते विश्वासार्ह नसल्याने आरोपींना सोडण्यात येत असल्याचे निरीक्षण न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी निकालपत्रातून नोंदवले.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी प्रज्ञासिंह ठापूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींची न्यायलयाने सुटका केली. या निकालाची प्रत शुक्रवारी जाहीर केली. एटीएस आणि एनआयएच्या तपासात विरोधाभास असल्याचे न्यायलयाने अधोरेखित केले. न्यायाधीशांनी नमूद केले की एटीएसच्या आरोपपत्रानुसार आरडीएक्ससह स्पह्टक यंत्र पुण्यातील एका घरात होते, तर एनआयएच्या निष्कर्षानुसार ते इंदूरमधील एका मोटरसायकलमध्ये बसवले होते आणि सेंधवा बस स्थानकावरून मालेगावला नेले. हा विरोधाभास न्यायालयाने निकालातून समोर आणला.
न्यायालयाची निरीक्षणे
आरोपपत्रातील तफावत आणि इतर बाबी एकमेकांशी सुसंगत नसल्याचे दिसून येते.
जरी हे गुन्हे राष्ट्राच्या सुरक्षिततेविरुद्ध आणि अखंडतेविरुद्ध असले तरी कायदा पुराव्याच्या मानकांना कमपुवत करत नाही.
अशा प्रकारच्या गुह्यात शिक्षा न झाल्याने समाजाला आणि विशेषतः पीडितांच्या पुटुंबीयांना किती वेदना, निराशा आणि आघात सहन करावा लागला आहे याची पूर्ण जाणीव असल्याचे न्यायालयाने नमूद केले.