भूपंपाच्या धक्क्यांनी पाकिस्तान हादरले

भूपंपाच्या तीव्र धक्क्यांनी शनिवारी सकाळी पाकिस्तान हादरले. या भूपंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 इतकी नोंदली गेली. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह खैबर पख्तुनवा आणि पंजाब प्रांतात भूंकपाचे धक्के बसले. त्यामुळे प्रचंड घबराट उडाली होती. अफगाणिस्तानातील हिंदूपुश पर्वतांमध्ये या भूपंपाचा केंद्रबिंदू होता. अफगाणिस्तान व ताझिकिस्तानलाही या भूपंपाचे हादरे जाणवले. भूपंपात जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.