
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. झारखंडचे मुख्यमंत्री आणि सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी ही माहिती दिली आहे.
शिबू सोरेन यांना किडनीशी संबंधित आजार होता आणि त्यांच्यावर मागील एक महिन्यापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वी ट्विटर) वर शेअर करत लिहिले, “आदरणीय दिशोम गुरुजी आम्हा सर्वांना सोडून गेले आहेत. आज मी शून्य झालो आहे…” सोरेन यांना जूनच्या अखेरच्या आठवड्यात गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते.
सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य होते आणि आदिवासी हक्कांसाठीच्या लढाईत अग्रणी भूमिका बजावली होती. त्यांनी स्वतंत्र झारखंड राज्याच्या चळवळीचे नेतृत्व केले आणि तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री पद भुषवले होते. झारखंडला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच राज्यभर शोक व्यक्त करण्यात आला. अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आदरणीय दिशोम गुरुजी हम सभी को छोड़कर चले गए हैं।
आज मैं शून्य हो गया हूँ…
— Hemant Soren (@HemantSorenJMM) August 4, 2025