
आयफोन यूजर्सला एक जोरदार झटका बसला आहे. कॉलर अॅपमध्ये उपलब्ध असलेले कॉल रेकॉर्डिंग फिचर 30 सप्टेंबर 2025 पासून बंद केले जाणार आहे. अॅपलने आयओएसच्या नव्या व्हर्जनमध्ये आपले स्वतःचे इन बिल्ट कॉल रेकॉर्डिंग सुविधा आणणार आहे. त्यामुळे या थर्ड पार्टी अॅप्सची गरज लागणार नाही. टकॉलरने आयफोन यूजर्सला सल्ला दिला आहे की, 30 सप्टेंबरपूर्वी सर्व कॉल रेकॉर्डिंगचा बॅकअप करून ठेवा. त्यानंतर सर्व रेकॉर्डिंग डेटा नेहमीसाठी डिलिट केला जाईल.