
निष्काळजीपणे चालताना कधी कधी टाच मुरगळते. जर टाच मुरगळली असेल तर यावर काही घरगुती उपाय आहेत. जो पाय मुरगळला असेल, त्या पायावर जास्त जोर देण्याचा प्रयत्न करू नका. टाच मुरगळल्यानंतर सूज आली असेल तर त्याला बर्फाने शेका.
पाय मुरगळल्यास एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात एक मूठभर सैंधव मीठ घाला व त्यात अर्धा तास पाय ठेवा. दिवसातून दोनदा हा उपाय केल्यास फायदा होईल. हळदीचे दूध पिणेसुद्धा आरामदायक ठरते. एक ग्लास कोमट दुधात एक चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळून त्याचे सेवन केल्याने टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळतो.