
ज्या वयात खेळाडू निवृत्ती घेण्याचा विचार करतात, त्या वयात झिम्बाब्वेच्या एका खेळाडूने पुनरागमन केलं आहे. साडेतीन वर्षांचा प्रतिबंध त्याच्यावर लावण्यात आला होता. जवळपास 42 महिने मैदानापासून लांब राहिल्यानंतर अखेर 39 वर्षीय ब्रँडन टेलरने 7 ऑगस्ट रोजी न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन केलं आहे. या सामन्यात ब्रँडन टेलरने ब्रायन बॅनेटच्या सोबतीने सलामीला येत फलंदाजी केली. विशेष म्हणजे या सामन्यातील पहिल्या डावात ब्रँडन व्यतिरिक्त इतर कोणताच फलंदाज चमकदार कामगिरी करू शकलेला नाही.
जवळपासस साडेतीन वर्षांनी मैदानात उतरल्यामुळे ब्रँडन टेलर भावुका झालेला पाहायला मिळाला. त्याने आपल्या भावना सुद्धा यावेळी व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “मी अनेक दिवस नरकासारखे घालवले, तो खूप कठीण काळ होता. 3 वर्षांपूर्वी मी अंथरूनातून उठू शकत नव्हतो, पण आज जे मला सर्वात जास्त आवडतं ते मी करत आहे, असं म्हणताना तो भावुक झाला. त्याचबरोबर त्याने झिम्बाब्वे क्रिकेट आणि कुटुंबातील सदस्यांचे आभार मानले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2022 साली ब्रँडन टेलरवर मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली साडे तीन वर्षांचा प्रतिबंध लावला होता. 2019 साली हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येत असताना एका हिंदुस्थानी व्यवसायिकाने त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात फिक्सिंग करण्यासाठी 15 हजार युएस डॉलर दिले होते, जे ब्रँडन टेलरने स्विकारले होते. ब्रँडन टेलर हा झिम्बाब्वेकडून खेळताना सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज आहे.
बॅझबॉल म्हणजे बेजबाबदार क्रिकेट, इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजीवर ग्रेग चॅपल यांचा संताप
न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटा मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ब्रँडन टेलर सलामीला आला आणि त्याने 107 चेंडूंचा सामना करत 44 धावांची खेळी केली. मात्र त्याच्या व्यितिरिक्त इतर कोणताच फलंदाज मैदानावर फारकाळ टिकू शकला नाही. त्यामुळे पहिल्या डावात झिम्बाब्वेची अवस्था सध्या 112 धावांवर 9 विकेट अशी झाली आहे. या मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.