
मँचेस्टर कसोटीत पायाला झालेल्या दुखापतीनंतरही मैदानात उतरणाऱया झुंजार ऋषभ पंतला आगामी आशिया कपमध्ये अपेक्षेप्रमाणे विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया आशिया कपमध्ये त्याची फटकेबाजी यूएईच्या कोणत्याही मैदानात दिसणार नाही, हे स्पष्ट झालेय. त्याला सहा आठवडे सक्तीची विश्रांती देण्यात आल्यामुळे तो आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेलाही मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता त्याच्या विश्रांतीमुळे यष्टिरक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या ध्रुव जुरेलसह ईशान किशन, संजू सॅमसन यांची नावे शर्यतीत असली तरी क्रिकेटच्या वेगवान फॉरमॅटमध्ये कुणाला लॉटरी लागते, हे लवकरच स्पष्ट होईल.