असं झालं तर, बँक बंद पडल्यानंतरही कर्ज भरण्याची नोटीस आली तर…

1 बँक बंद पडली असेल तरी कर्ज बाकी असू शकते. अशा वेळी त्या बँकेची थकबाकी इतर बँक किंवा ARC ने विकत घेतलेली असू शकते. नवीन संस्थेची नोटीस येऊ शकते.

2 अनेकदा बंद पडलेल्या बँकेच्या जुन्या थकबाकीवरून बनावट नोटिसा पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे खात्री केल्याशिवाय कोणतीही रक्कम भरू नका.

3 नोटीस कोणत्या संस्थेकडून आली आहे? नोटीस कायदेशीर आहे का? अधिकृत सरकारी किंवा न्यायालयीन आदेशासोबत आहे का? हे तपासा.

4 वकील किंवा सीएचा सल्ला घ्या. नोटीस कायदेशीर आहे का, हे तपासून ते योग्य मार्गदर्शन देतील. बँकेच्या उत्तराधिकारी संस्थेशी संपर्प साधा.

5 कर्जाची वसुली करण्याची कालमर्यादा तीन वर्षे असते. त्यानंतर ते कालबाह्य ठरते. याचा अर्थ ते रद्द होते असा नाही, पण कोणी न्यायालयीन दडपण आणू शकत नाही.