पाकिस्तानने अखेर रंग दाखवला…हिंदुस्थानी दूतावासातील कर्मचाऱ्यांचे पाणी तोडले; गॅस पाईपलाईनही बंद केली

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे नाक कापले गेल्याने पाकिस्तानचा अजूनही थयथयाट सुरू आहे. आता पाकिस्तान सरकारने हिंदुस्थानी दूतावासातील कर्मचाऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. दूतावासातील कर्मचाऱ्यांचे पाणी तोडण्यात आले असून गॅस पाईपलाईनही बंद करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी स्थानिक बाजारातून गॅस सिलिंडर घ्यावेत, असे फर्मान पाकिस्तान सरकारने सोडले आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे पाकिस्तान बिथरला आहे. सिंधू जलकरार स्थगित करण्यात आल्यामुळे सिंध तसेच पंजाब प्रांतातील शेतीचे वाळवंट होत असून या भागात पिण्याच्या पाण्याची भयंकर टंचाई निर्माण झाली आहे. थेट युद्धात टिकाव धरू शकत नसल्यामुळे आता पाकिस्तान सरकारने छुप्या कारवाया सुरू केल्या आहेत. पाकिस्तानात असलेल्या हिंदुस्थानी दूतावासातील कर्मचाऱ्यांचे पाणी तोडण्यात आले आहे. दूतावासाला पाणी विकाल तर याद राखा!, अशी धमकीच पाणी विक्रेत्यांना देण्यात आली आहे.

हिंदुस्थानी दूतावासाला सुई नॉर्थन कंपनीकडून गॅस पुरवण्यात येतो. आयएसआयने हा गॅस पुरवठा बंद करण्यासाठी कंपनीवर दबाव आणला. सध्या दूतावासाचा गॅस पुरवठा बंद आहे. गॅस पुरवठादारांनाही हिंदुस्थानी दूतावासाकडे फिरकायचे नाही अशी दमबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना स्थानिक बाजारातून महागडे सिलिंडर घ्यावे लागत आहेत.

…तर हिंदुस्थानशी युद्ध अटळ; असीम मुनीरनंतर बिलावल भुट्टोची धमकी

व्हिएन्ना कराराचे उल्लंघन

दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सेवासुविधांविषयी व्हिएन्ना कराराने नियमावली आखून दिली आहे. दूतावासाचा कारभार सुरळीत, सुरक्षित आणि आदर राखूनच झाला पाहिजे. परंतु, पाकिस्तान सरकारने हिंदुस्थानी दूतावासातील कर्मचाऱ्यांचे पाणी, गॅस तोडून व्हिएन्ना कराराचे थेट उल्लंघन केले आहे.

ट्रम्प यांचे पाकड्यांना गिफ्ट; बलूच लिबरेशन आर्मी आणि माजीद ब्रिगेड दहशतवादी संघटना घोषित